Ad will apear here
Next
‘भाजप सरकार भेदभाव न करता जनतेची सेवा करेल’
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबई : ‘केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे आपण आभारी आहोत. मोदींच्या सूचनेनुसार भाजपचे सरकार कोणताही भेदभाव न करता पारदर्शीपणे जनतेची सेवा करेल,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि नवनियुक्त केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर दानवे यांचे चार जून २०१९ रोजी प्रथमच भाजप प्रदेश कार्यालयात आगमन झाले. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले व त्यांचा सत्कार केला. नवनिर्वाचित खासदार गोपाळ शेट्टी यांचा या वेळी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, माध्यम विभागप्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, खासदार संजय पाटील, आमदार नरेंद्र पवार, आमदार तमिळ सेल्वन, दीव दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते कांता नलावडे, विश्वास पाठक, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी व ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील उपस्थित होते.


या वेळी बोलताना दानवे म्हणाले, ‘भाजपने लोकसभा निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजप आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही भेदभाव करणार नाही. शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय अशा सर्वांसाठी सरकार काम करेल. सामान्य आणि गोरगरिबांच्या हक्कांसाठी लढणारे हे सरकार आहे.’

‘लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पहिल्या दोन टप्प्यांत विदर्भ व मराठवाड्यात प्रचार केला; पण तिसऱ्या टप्प्याच्या वेळी आजारपणामुळे आपल्याला स्वत:ला मतदारसंघातही प्रचार करता आला नाही. माझ्या मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक लढवून मला विजयी केले. आपण त्यांचे आभार मानतो. पंतप्रधानांना चांगला जनादेश देणाऱ्या राज्यातील व देशातील जनतेचेही आपण आभार मानतो,’ असे दानवे म्हणाले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZXFCB
Similar Posts
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी मुंबई : राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये झालेल्या विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सरपंचपदे जिंकून भारतीय जनता पक्षाने पुन्हा पहिला नंबर मिळवला आहे. या यशाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व मतदारांचे आभार मानले.
‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ मुंबई : ‘जळगाव व सांगली–मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले जबरदस्त यश म्हणजे जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. या विजयाबद्दल मी मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी शुक्रवारी (तीन ऑगस्ट) व्यक्त केली
‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ मुंबई : ‘विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून, ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) व्यक्त केला, तर ‘निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला
‘प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पाच वर्षे पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी असून, या कालावधीत भाजपला राज्यात पंचायत ते पार्लमेंट या सर्व स्तरावर पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविल्याबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language